Dream 11 cup under 14: सचिन तेंडुलकर संघाला विजेतेपद

तिन्ही सामन्यात पहिल्या डावातील आघाडीचे गूण मिळविणाऱ्या सचिन तेंडुलकर संघानेच ड्रीम 11 कप 14 वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आज संपलेल्या लढतीत तेंडुलकर संघाने काळ 183 धावांत बाद झाल्यानंतरही आज वेंगसरकर संघाला 182 धावांत गुंडाळून केवळ एक धावेची आघाडी मिळवत तीन गुणांची कमाई केली आणि विजेतेपदावर देखील शिक्कामोर्तब केले. कर्नाटक सपोर्टींग वरील लढतीत सुनील गावस्कर संघाने रवी शास्त्री संघाला 198 धावांत रोखून पहिल्या डावातील आघाडी मिळविली. या लढतीत एकावेळी रवी शास्त्री संघाने 96 धावांत 8 बळी गमावले होते, मात्र शाहिद खान (76) आणि शाश्वत नाईक (41) या जोडीने नवव्या विकेटसाठी 100 धावांची भागी रचून त्यांचा अंत पहिला.

दरम्यान यंदाच्या आय. पी. एल. स्पर्धेतील सर्वात यशस्वी ठरलेला यशस्वी फलंदाज यशस्वी जैस्वाल याची पारितोषिक वितरण समारंभातील उपस्तीथी हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. यावेळी बोलताना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की यशस्वी हा देखील काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत खेळाला होता. मात्र प्रचंड मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर आज तो इथपर्यंत पोहोचला आहे. आय.पी.एल. सारख्या मोठ्या स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी करून आपली वेगळी छाप पाडली आहे. 14 वर्षाचा असताना आम्ही त्याला पहिल्यांदा इंग्लंड मध्ये खेळण्यासाठी नेले होते त्यावेळी त्याने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून दाखविली होती. या समारंभात ड्रीम स्पोर्ट्सचे हर्ष जैन, एम.सी.ए.चे सचिव अजिंक्य नाईक , पी.वी.शेट्टी, दीपक पाटील आणि 14 वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे सर्व सिलेक्टर उपस्थित होते. य स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून दर्शन राठोड याला गौरविण्यात आले तर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून युग असोपा आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून युवान शर्मा यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक – सुनील गावस्कर संघ – 79.3 षटकांत सर्वबाद 298 आणि 11 षटकांत 1 बाद 46 वि. वि. रवी शास्त्री संघ – 66.2 षटकांत सर्वबाद 198 (सम्रीद्ध भट 16, विधिराज शुक्ल 21, प्रितेश बेंगानी 19, शाहिद खान 76, शाश्वत नाईक 41; झैद खान 39 धावांत 5 बळी, श्लोक कडवं 30 धावांत 2 बळी)

सचिन तेंडुलकर संघ – 50.5 षटकांत सर्वबाद 183 आणि 59 षटकांत वि. दिलीप वेंगसरकर संघ – 57.2 षटकांत सर्वबाद 182 (जनमेय पाटील 51 , आर्यन म्हात्रे 27, हर्ष कदम 19, क्रिश उपाध्याय 20, दर्शन राठोड 13, युवान शर्मा नाबाद 30; हर्ष नाडकर 68 धावांत 5 बळी,अद्वैत जोशी 28 धावांत 2 बळी)