बस ड्रायव्हरने रक्ताने भरली तरुणीची भांग, छेडछाडीला विरोध केला म्हणून केली मारहाण

बस ड्रायव्हरने आपल्या रक्ताने एका तरुणीची भांग भरली, या तरुणीची छेड काढल्याने तरुणी चिडली. तर नराधम चालकाने तिला मारहाण केली.

उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. हापुड जिल्ह्यात राहणारी एक तरुणी नोएडामध्ये खासगी कंपनीत कामाला होती. कंपनीच्या बसने ती दररोज ऑफिसला जायची आणि बसनेच ऑफिसवरून घरी यायची. हा बस ड्रायव्हर गेली एक वर्ष या तरुणीच्या मागावर होता. वर्षभर तो तरुणीला त्रास देत होता. आज तर त्याने कहरच केला. कंपनीत बस आल्यावर सर्व कर्मचारी खाली उतरले. तेव्हा ही तरुणी उतरण्यापूर्वीच चालकाने बसचा दरवाजा बंद केला. तिला प्रेमाची मागणी घातली. नंतर चाकून स्वःताच्या हातावर वार केला आणि या रक्ताने तिची भांग भरली. त्यानंतरही ही तरुणी विरोध करत होती. तेव्हा या चालकाने तिची छेड काढायला सुरुवात केली, तरुणीने विरोध करताच चालकाने तिला मारहाण केली.

नंतर तरुणी घरी आली आणि आपल्या कुटुंबीयांना झाला प्रकार सांगितला. तरुणीचा नातेवाईकांनी कंपनीजवळ धाव घेतली. त्या चालकाला गाठलं आणि त्याला चोप दिला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले आणि चालकाला ताब्यात घेतले.