सौदीतील अरामको कंपनीच्या तेल केंद्रांवर ड्रोनहल्ले

566

जगातील सर्वांत मोठी तेल कंपनी अशी ओळख असलेल्या सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन तेल केंद्रांवर आज पहाटे ड्रोनहल्ले करण्यात आले. यामुळे तेल केंद्रांना भीषण आग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने आज दिली. यापूर्वी तेल केंद्रांवर अशा प्रकारचे हल्ले केल्याचे दावे येमेनी बंडखोरांनी केले होते, मात्र आजच्या ड्रोनहल्ल्यांबाबत अद्यापि कोणीही दावा केलेला नाही. पूर्व सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या तेल केंद्रांवर आज भल्यापहाटे हल्ला झाला. त्यानंतर उसळलेल्या आगीचा धूर दूर अंतरावरून दिसत होता. जगातील सर्वांत बडा क्रूड तेल निर्यात करणारा देश असलेल्या सौदी अरेबियातील तेल केंद्रांवर मानवविरहीत ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आल्यामुळे सौदी अरेबियातील तेल केंद्रांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या