माजलगाव शहरावर ड्रोनची नजर, घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

1867

शहरात लॉकडाऊन व संचारबंदी असतांना लोक घराबाहेर विनाकारण पडून गर्दी करत असल्याने अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे शहरात फिरवण्यात येणार असून त्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली.

लोकांनी जीवनावश्यक वस्तूही घेत असताना विशिष्ट अंतरावर उभे राहून घेतले पाहिजे अशी सूचना ही दिली जात आहे. त्या पाळण्यात येतात. मात्र किराणा बाजारपेठ व भाजीपाला बाजारात शहरात अजूनही काही ठिकाणी गर्दीमुळे गोंधळ उडतो. आझादनगर, गौतम नगर, भीमनगर यासह हनुमान चौक व विविध वसाहती यामधील लोक विनाकारण बाहेर पडून गटागटाने गप्पा मारत असल्याचे दिसून येत असल्याने ते आदेशाचा भंग करीत आहेत. त्यासाठी आता नवा पर्याय पोलिसांनी वापरात आणला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्या आदेशानुसार शहरात गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगळवार पासून पोलिसांकडून ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. रस्त्यावर वाहने आणण्यास बंदी असताना

विनाकारण रस्त्यावर आपली वाहने घेऊन येणाऱ्यांवर ड्रोनच्या फुटेजचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे याबाबत खबरदारी घ्यावी, अशी माहिती पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या