राज्यात युतीपेक्षाही सध्या पडलेला दुष्काळ महत्त्वाचा

सामना प्रतिनिधी । माढा

युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी माढा येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत युतीपेक्षाही सध्या पडलेला दुष्काळ महत्त्वाचा असून त्याचे निवारण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार नारायण पाटील, जिल्हा समन्व्यक प्रा. शिवाजीराव सावंत, शहर प्रमुख शंभू साठे, मुन्नाराजे साठे, रामभाऊ पवार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माढा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चारा व पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधव व महिलांशी सवांद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवसेना आपल्या सोबत आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बँक ऑफ इंडिया जवळील जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या युवा नेत्याला पाहण्यासाठी माढा शहरातील अबाल वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती.