महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दुष्काळ, 31 ऑक्टोबरला घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जगातील 85 टक्के लोक दुष्काळी भागात राहतात

सामना प्रतिनिधी, जळगाव

राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला असून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल मागवण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यावर तातडीने विचार करून 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जळगाव येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.

कमी पावसामुळे बहुतेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे. महसूल व कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील तब्बल 201 तालुक्यांमध्ये 21 दिवस पाऊस पडलेला नाही. जिल्हाधिकारी स्तरावर 25 ऑक्टोबरपर्यंत पाहणी करून दुष्काळी तालुके जाहीर करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार आहे.

summary- drought situation in maharashtra