गोव्यातील ड्रग्ज तस्कर गजाआड, मुंबई एनसीबीची कारवाई

उत्तर गोव्यात ड्रग्जचा धंदा करणाऱया मुदुका चिराह ऊर्फ मुस्तफा ऊर्फ टायगरच्या अखेर नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पळून गेल्यावर राहण्यास घर उपलब्ध करून देणाऱया केजेटन फर्नांडिसलादेखील एनसीबीने अटक केली. ते दोघे सध्या एनसीबी कोठडीत आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी एनसीबीने गोव्यात कारवाई करून एका पेडलरला अटक केली होती. त्या पेडलरच्या चौकशीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनखाली मुंबई आणि गोवा युनिटने उत्तर गोव्यात संयुक्त कारवाई केली. उत्तर गोव्याच्या अरंबोल बीचजवळील नेगी पॅफेवर एनसीबीने छापा टाकला. छापा टाकून एनसीबीने 58 ग्रॅम एम्फेटामाईन, 15 ब्लॉट्स एलएसडी, कोकेन, एमडीएमए, जप्त केले. तर कारवाईदरम्यान मुख्य पेडलर टायगर हा पळून गेला होता.

त्याच्या शोधासाठी एनसीबीने विशेष पथक तयार केले. एनसीबी मुंबई, गोवा युनिटने अखेर तपास करून टायगरच्या मुसक्या आवळल्या. टायगरला फर्नांडिसने राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. जागा देणाऱया फर्नांडिसलादेखील एनसीबीने अटक केली. त्या दोघांना अटक करून मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांना एनसीबी कोठडी सुनावली आहे. टायगर हा मुंबईतील कोणत्या पेडलरच्या संपका&त होता त्याचा तपास आता एनसीबी करत आहेत.

फुटबॉलपटू ते ड्रग्ज पेडलर

मुदुका हा मूळचा नायजेरिन असून तो 2005 साली हिंदुस्थानात आला. तो फुटबॉलपटू असून झटपट पैशासाठी ड्रग्जच्या धंद्यात आला. ड्रग्जच्या धंद्यात आल्यावर तो उत्तर गोव्यात स्वतःचे साम्राज्य करू पाहत होता. दहशत पसरवण्यासाठी त्याने स्थानिकांनादेखील मारहाण केली होती. तर पोलिसांवरदेखील त्याने हल्ला केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या