गुंगीच्या गोळ्या विक्री करणारा तरूण बीडमध्ये ताब्यात

384
प्रातिनिधिक फोटो

नशेची गुंगी आणणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला सोमवारी दुपारी तीन वाजता शहरातील कबाड गल्लीत ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.

संतोष कोंडीराम भोसले (22, रा.कबाडगल्ली, बीड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नशा करण्यासाठी तो अल्प्रॅकॅनच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. औषध प्रशासनाचे निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांना सोबत घेऊन उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांनी कबाड गल्लीत सापळा रचून एका वाड्यासमोरून संतोष भोसलेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मळकट पांढऱ्या पिशवीत हानीकारक, अपायकारक असलेल्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.

या गोळ्य झोप येण्यासाठी व गुंगीसाठी वारपल्या जातात. औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे, उपनिरीक्षक संतोष जोंधळे, पोहेकॉ मुकुंद तांदळे, पो.ना.गणेश हांगे, शेख अन्वीर, शेख नसीर, राजू वंजारे यांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या