व्यसनाधीन मुलाने केली बापाची निर्घृण हत्या

36

सामना प्रतिनिधी । अकोला

व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या बापाची लोखंडी रॉड डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री कानशिवणी येथे घडली. घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला आहे.

मृतकाचे नामदेव राऊत (70) असे आहे. मृतक हे कानशिवनी येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुली, दोन मुले आहे. मोठा मुलगा चंदु हा परिवारात व्यसनाधिन असल्याचे बोलले जाते. चंदूच्या व्यसनावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री वडील व सर्व कुटुंबीय झोपी गेले असताना चंदुने लोखंडी रॉडने झोपेत असलेल्या आपल्या जन्म दात्यावर वार केले. हे वार एवढे जबरदस्त होते की नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या