मला दारू आणून द्या, तळीरामाची पोलिसांना मागणी 

1104

दारू मिळत नसल्याने एका तळीरामाने थेट 100 नंबरवर फोन करून पोलिसांनाच दारूची मागणी केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या इसमाने फोन केल्यानंतर पोलीस त्याकडे गेले असता, त्याने पोलिसांना आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला की, त्याचे बाबा त्याला दारू नाही देत आहे. त्यामुळे तुम्ही मला दारू आणून द्या, अशी मागणी या इसमाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा इसम ज्या दुकानात दारू खरेदी करण्यासाठी गेला होता, ती दुकान त्याच्या आजोबांची आहे. त्याने आजोबाना दारू मागितली असता त्यांनी त्याला दारू देण्यास नकार दिला. यानंतर त्याने दारूसाठी थेट पोलिसांना फोन करून मागणी केली. पोलिसांनी या इसमाला दारू न दिल्याबद्दल आजोबांवर कारवाई करावी का? असे विचारले असता तो म्हणाला की, आपण कोणतीही कारवाई करू नका, मला फक्त दारू आणून द्या.

आपली प्रतिक्रिया द्या