दुबईत हिंदुस्थानीला 40 लाखांसह कारची लॉटरी

466

संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱया एका हिंदुस्थानी दुकानदाराचे नशीब फळफळले आहे. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये त्याने लॉटरीत सुमारे 40 लाख आणि आलिशान कार जिंकली आहे. श्रीजित असे या भाग्यवान विजेत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे श्रीजित गेल्या दहा वर्षांपासून लॉटरी काढत आहे.

दुबईच्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी लॉटरी जिंकण्याची संधी एकाला मिळते. त्यासाठी साधारणपणे चार हजार रुपयांचे एक तिकीट काढावे लागते. फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी नशीबवान विजेत्याचे नाव जाहीर केले जातात. यंदा लॉटरीचा विजेता म्हणून श्रीजितचे नाव जाहीर करण्यात आले.

z ‘उबेर इटस’च्या प्लॅटफॉर्मवर 41 शहरांतील 26 हजार रेस्टॉरंट आहेत. तर ‘झोमॅटो’च्या रेस्टॉरंट डिस्कव्हरी आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर 24 देशांतील 15 लाख रेस्टॉरंटची माहिती उपलब्ध आहे. ‘झोमॅटो’चे सध्या 550 शहरांमध्ये नेटवर्क आहे.

आपली प्रतिक्रिया द्या