
लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफी करण्यात अडचण येत आहे अशी कबुली महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईन असेही मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापुरातल्या एका सभेत मुश्रीफ म्हणाले की, लाडक्या बहिणीसाठी आम्हाला 46 हजार कोटी रुपये लागणार आहेत. पण लाडक्या बहिणींच्या नावाने 14 हजार पुरुषांनीच पैसे घेतले होते. आमची अडचण जरी होत असली तर आम्ही कर्जमाफीच्या अनेक योजना आणल्या आहेत. कर्जमाफीची अडचण आहे. कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्जच फेडत नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट रक्कम दिली पाहिजे. मी जर मुख्यमंत्री झालो पुढे मागे तर शेतकऱ्यांना 50 हजार ऐवजी एक लाख रुपये देईन असेही मुश्रीफ म्हणाले.





























































