
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची धुरा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. संघात श्रेयस अय्यर असतान शार्दुल ठाकूरची कर्णधारपदी निवड केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच अनुभवी खेळाडू अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान दिलं नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 28 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघाची निवड करण्यात आली आहे. संघामध्ये कर्णधार शार्दुल ठाकूरसह यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर, सरफराज खान आणि ऋतुराज गायकवाड सारख्या धुरंधर खेळाडूंचा समावेस आहे. परंतु या संघात अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डावलण्यात आल्याने चर्चांना उधान आलं आहे. दोघांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. असे असताना त्यांना का डावल्याण आलं यात उत्तर अद्याप मिळालेलं नाही. दुसरीकडे कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेल्या श्रेयस अय्यरला वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदापासून दुर ठेवण्यात आलं आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई चषकासाठी हिंदुस्थानच्या संघात त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नेतृत्वाची जबाबदारी शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
वेस्ट झोन संघ
शार्दुल ठाकूर (कर्णधार), श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्र जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.