Duleep Trophy 2026 – अंतिम सामना अनिर्णित; ईस्ट झोनने पटकावलं विजेतेपद, उपविजेत्यांनाही मिळाला घसघशीत इनाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Duleep Trophy 2026 चा अंतिम सामना ईस्ट झोन आणि साउथ झोन यांच्यामध्ये खेळला गेला. दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली. मात्र, सामना अनिर्णीत राहिला आणि पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनने विजेतेपद पटकावले. जवळपास 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ईस्ट झोनने ऐतिहासिक विजय मिळवत 1 कोटी रुपयांच बक्षीस जिंकल आहे. त्याचबरोबर उपविजेत्या साऊथ झोनलाही 50 लाख रुपयांच घसघशीत इनाम मिळालं आहे.

फायनलमध्ये ईस्ट झोनने पहिल्या डावात 708 धावांचा डोंगर उभा केला होता, ज्यामध्ये कर्णधार इशान किशनने दमदार 270 आणि कुमार कुशाग्रने 101 धावांची खेळी केली. या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना साऊथ झोनचा डाव 336 धावांवर आटोपला, ज्यामुळे ईस्ट झोनला पहिल्या डावात 372 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. सामना अनिर्णीत झाल्यानंतर नियमानुसार पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर विजेता ठरवण्यात आला. या संपूर्ण स्पर्धेची एकूण प्राइज मनी दीड कोटी रुपये इतकी होती. ही संपूर्ण रक्कम कोणत्याही एका खेळाडूला न देता संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफमध्ये नियमांनुसार वाटली जाते, ज्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळाले.