दुष्यंत चौटाला यांच्यासाठी सत्तेचा मार्ग खडतर

651

हरयाणाचे उपमुख्यमंत्री बनलेल्या दुष्यंत चौटाला यांच्यासाठी सत्तेचा हा मार्ग अत्यंत खडतर असणार आहे. चौटाला यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार केला. भाजपावर सातत्याने टीका केली आणि 10 जागांवर यश मिळवले. आता त्यांना भाजपाशीच हातमिळवणी करून सरकारमध्ये सामील व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

दुष्यंत चौटाला यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार भाजपाचे सुभाष बराला, कॅप्टन अभिमन्यू, राज्यसभा खासदार विरेंद्र सिंह यांची पत्नी प्रेमलता सिंह यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले आहेत. तसेच चौटाला यांनी जरी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरीही सरकारमध्ये त्यांनी मोठी मजल मारू नये यासाठीच प्रयत्न केले जातील. तसेच जेजेपीची जी ध्येय आणि धोरणे आहेत त्यासाठी काम करणेही पक्षाला कठीण होऊन बसेल असेही काही राजकीय तज्ञांचे मत आहे.

भाजपा दुष्यंत यांना हीरो बनू देणार नाही

भाजपा दुष्यंत यांना सत्तेत कधीही हीरो बनू देणार नाही. जेजेपी आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक फरक आहेत. त्यामुळे सरकारचा कार्यकाळ सुरू झाल्यानतंर काही महीन्यातच भाजपा आणि जेजेपीच्या कार्यपद्धतीबाबत फरक दिसून येईल. या पार्श्वभूमीवर दुष्यंत यांच्यासाठी सत्तेचा मार्ग अत्यंत खडतर असेल, असे राजकीय तज्ञांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या