पदक विजेता दुष्यंतची तब्येत बिघडली

13

सामना ऑनलाईन । जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी हिंदुस्थानला नौकानयन मधील पुरुष एकेरीमध्ये कांस्य पदक मिळवून देणाऱ्या दुष्यंत चौहान याची तब्येत बिघडली असून त्याला स्पर्धा स्थळापासून स्ट्रेचरवरून नेण्यात आले. दुष्यंत पदक स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना तो चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

दुष्यंतने शुक्रवारी संध्याकाळी नौकायनाात कांस्य पदक मिळवले. स्पर्धा संपल्यानंतर पदक वितरण समारंभाच्या वेळी कांस्य पदकासाठी त्याचे नाव उच्चारण्यात आले. त्यानंतर जेव्हा दुष्यंत स्टेजकडे जात असताना अचानक त्याला चक्कर आली व तो खाली पडला. ते बघून उपस्थित सर्वच घाबरले. त्यानंतर दुष्यंतला तत्काळ स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले. दुष्यंतला उच्च रक्तदाबाचा त्रास असून त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या