अॅड. मेराज शेख यांची नोटरी वकील म्हणून नियुक्ती

केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश कार्यक्षेत्रामध्ये नोटरी व्यावसायिक म्हणून युवासेना सहसचिव आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅड. मेराज शेख यांना प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, खोपोली, अलिबाग, उरण, बदलापूर, भिवंडी, वसई-विरार महापालिकेबरोबर पालघर जिह्यातील शहरी महापालिका, नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रात त्यांना नोटरी व्यवसाय करता येणार आहे. मेराज शेख गेली अनेक वर्षे गरीब गरजू लोकांना वैद्यकीय मदत आणि कायदेविषयक मदत मोफत देत आहेत. दरम्यान, ही मला मिळालेली संधी असून यापुढेही विद्यार्थी आणि गोरगरिबांसाठी, रुग्णांसाठी मोफत सेवा कार्य सुरूच ठेवू, अशी भावना शेख यांनी व्यक्त केली.