मोदी सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर…

2948
फाईल फोटो

नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत देशभरामध्ये ई-सिगारेटवर (E-Cigrattee) बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, आयात, वाहतूक, हस्तांतरण, साठवणूक आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. देशभरामध्ये हा निर्णय होणार आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांनाच 78 दिवसांचा बोनस का? वाचा कारण

ई-सिगारेटच्या विळख्यामुळे कॉलेज तरुणाई पडत असल्याचे दिसून आले. याबाबत काही दिवसांपूर्वी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स (GoM)कडून ई-सिगारेटच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. यानंतर GoM ने काही बदलाव आणि सूचनाही दिल्या होत्या. त्यानंतर आता बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये ई-सिगारेटर बंदी घालण्यात आली.

e-sigarate

आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी दंडाचा आणि शिक्षेचा प्रस्ताव दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास एक वर्षाची शिक्षा आणि 1 लाखांच्या दंडाचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. तर एकापेक्षा जास्त वेळा नियमांचा भंग केल्यास 5 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्ष तुरुंगवासाची शिफारस केली आहे.

ई-सिगारेट म्हणजे काय?
ई-सिगारेट एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिकल इनव्हेलर असते. यात निकोटिन आणि रसायनयुक्त तरल पदार्थ भरलेला असतो. यातील इनव्हेलर बॅटरीद्वारे मिळणाऱ्या उर्जेद्वारे तरल पदार्थाचे धुरामध्ये रुपांतर करते आणि याला ओढणाऱ्या व्यक्तीला सिगारेट प्यायल्यासारखे वाटते. ई-सिगारेट ही वेगवेगळ्या 150 फ्लेव्हरमध्ये (चव) उपलब्ध आहे. 400 ब्रँडमध्ये ही ई-सिगारेट उपलब्ध असून यातील एकाचेही उत्पादन हिंदुस्थानात होत नाही. यातील निकोटिन आणि रसायन सर्वाधिक खतरनाक असते. तर काही कंपन्यांच्या सिगारेटमध्ये फॉर्मलडिहाईडचा वापर केलेला असतो. यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो.

ई-सिगारेटचे तोटे –

  • ई-सिगारेटचे सेवन केल्याने व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते.
  • एका संशोधनामध्ये ई-सिगारेट पिणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकची शक्यता 56 टक्क्यांनी वाढते.
  • जास्त काळ ई-सिगारेट ओढल्यामुळे ब्लड क्लॉटची समस्या उद्भवू शकते.
  • श्वसनाचे आजार आणि कॅन्सरसारखे खतरनाक आजार होण्याची शक्यता अधिक असते.
आपली प्रतिक्रिया द्या