
तुरुंगात असलेल्या कैद्यांना कुटुंबीय व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई-प्रिझन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ई-मुलाखत सुविधा कार्यान्वित झाली आहे. ही सुविधा सर्व तुरुंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये अशा सुमारे 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती झाल्या आहेत. या कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात 45 हजार 174, तळोजा कारागृहात 43 हजार 848, ठाणे कारागृह येथे 36 हजार 371, मुंबईतील आर्थर रोड कारागृहात 29 हजार 347, नागपूर कारागृहात 31 हजार 444, कल्याण कारागृहात 22 हजार 608, नाशिकरोड कारागृहात 23 हजार 860 इतक्या ई-मुलाखती झालेल्या आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबीयांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.