कोरोना बाहेर पडू देईना, भूकंप घरात राहू देईना; डहाणू , पालघर, तलासरी हादरले

योगेश चांदेकर, डहाणू

एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण हिंदुस्थान लाॅकडाऊनमध्ये असतानाच बुधवारी रात्री उशिरा डहाणू, पालघर तसेच तलासरी तालुका भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामीण भागातील आदिवासी यामुळे प्रचंड धास्तावले आहेत.

बुधवारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के जाणवले. बोर्डी, धुंदलवाडी, कासा तसेच बाईसर पर्यंत या भूकंपाचे हादरे बसल्याने ग्रामस्थ घाबरून गेले.

अनेकांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला तर काहींनी अख्खी रात्र अक्षरशः जागून काढली. आधीच कोरोनाचा दुष्काळ त्यात भूकंप म्हणजे तेरावा महिना अशी परिस्थिती पालघर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या भूकंपामुळे पालघर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता हे अद्याप समजू शकले नाही.                                                                            भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

● नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018

11 नोव्हेंबर – 3.2 रिश्टर स्केल

24 नोव्हेंबर – 3.3 रिश्टर स्केल,

1 डिसेंबर – 3.1 व 2.9 रिश्टर स्केल

4 डिसेंबर – 3.2 रिश्टर स्केल

7 डिसेंबर – 2.9 रिश्टर स्केल

10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल

● 2019

20 जानेवारी – 3.6 रिश्टर स्केल

24 जानेवारी – 3.4 रिश्टर स्केल

1 फेब्रुवारी – 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल

7 फेब्रुवारी – 3.3 रिश्टर स्केल

13 फेब्रुवारी – 3.1 रिश्टर स्केल

20 फेब्रुवारी – 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल

1 मार्च – 3.2, 4.3 रिश्टर स्केल

9 मार्च – 2.8 रिश्टर स्केल

10 मार्च – 3.5 रिश्टर स्केल

31 मार्च – 3.2 रिश्टर स्केल

2 एप्रिल – 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल

9 एप्रिल – 3.0 रिश्टर स्केल

15 एप्रिल – 3.4 रिश्टर स्केल

12 मे – 2.6 रिश्टर स्केल

10 जुलै – 2.6 रिश्टर स्केल

20 जुलै – 3.5 रिश्टर स्केल

24 जुलै – 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल

25 जुलै – 4.8, 3.6 रिश्टर स्केल

31 जुलै – 3.00 रिश्टर स्केल

13 ऑगस्ट – 3.2 रिश्टर स्केल

21 ऑगस्ट – 2.5 रिश्टर स्केल

20 सप्टेंबर – 3.3 रिश्टर स्केल

21 सप्टेंबर – 3.2 रिश्टर स्केल

2 सप्टेंबर – 3.4 रिश्टर स्केल

24 सप्टेंबर – 2.8 रिश्टर स्केल

26 ऑक्टोंबर – 2.7 रिश्टर स्केल

18 नव्हेंबर – 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल

21 नोव्हेंबर – 3.5 रिश्टर स्केल

आतापर्यंत भूकंपाचे एकूण 54 धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या