मुंबईसह नाशिकला भूकंपाचा धक्का, 2.7 रिश्टर स्केलची तीव्रता

earthquake-measurement

सलग दुसऱ्य़ा दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मुंबईत तर 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरले. नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. शुक्रवारी मध्यरात्री 11.41 च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली असली तरी मुंबई महापालिकेने मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे.

पालघर, डहाणू, तलासरीही हादरले

आज सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी पालघर, डहाणू, तलासरी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. सकाळी झोपेत असतानाच 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण भितीने अनेकजण घराबाहेर पळाले. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास बसलेल्या धक्क्यांमुळे धुंदलवाडीतील चिंचले येथे राहणाऱ्य़ा दत्तू पडवले या ग्रामस्थाच्या घराचे पत्रे कोसळले. मात्र कोणालाही इजा झाली नाही. पालघर जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के बसत असून भीतीचे सावट कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या