अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे हिंदुस्थानलाही जाणवले. दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानच्या काही भागात भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी 11:26 वाजता काबूलच्या 277 किमी ईशान्येला 255 किमी खोलीवर 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या भूकंपाचा परिणाम पाकिस्तानमध्येही झाला. जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी पाकिस्तानातील इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद आणि आसपासच्या भागात हादरे बसले. पाकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता 5.4 एवढी वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तूनख्वाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये हा भूकंप 11 वाजून 26 मिनीटांवर दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये जाणवला, ज्याचा प्रभाव दिल्ली एनसीआरमध्येही जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, 11:26 वाजता काबूलच्या ईशान्येस 255 किलोमीटर 277 किलोमीटर खोलीवर 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जमिनीला हादरे बसताच लोक घराबाहेर पडू लागले. मात्र अद्याप कोणत्याही नुकसानाचे वृत्त नाही. त्याचा परिणाम दिल्ली एनसीआरमध्येही जाणवला.