अंदमान, निकोबारला भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेची नोंद

प्रातिनिधीक फोटो

देशातील काही राज्यांना भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरुच आहे. रविवारी सकाळी अंदमान आणि निकोबार द्विपसमूहाला भूकंपाचे धक्के बसले. दिगलीपूर भागात त्याची तीव्रता जास्त होती. रविवारी सकाळी 8.56 मिनिटांनी बसलेल्या य भूकपांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 एवढी नोंदली गेल्याची माहिती भूकंपमापन विभागाने दिली आहे. या भूकंपामध्ये जिवीत किंवा वित्तहानीचे वृत्त नाही.

याआधीही जम्मू कश्मीर, राजधानी नवी दिल्ली, गुजरात, मेघालय, मिझारोम,त्रिपुरा,आसाम,मणीपूर सह ईशान्येकडील राज्यांना गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणावत आहे. मिझोरामला आतापर्यंत चारवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. देशभरातील विविध राज्यांना सातत्याने बसणाऱ्या भूकंपांचे धक्के चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एखाद्या मोठ्या भूकंपाचे हे संकेत असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या