बिहार-बंगालसह ईशान्य हिंदूस्थान हादरला, 5.5 रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. बुधवारी सकाळीच हरयाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र त्याची तीव्रता कमी होती.

सकाळी 10.30 च्या सुमारास झालेल्या भूकंपाचे केंद्र हे बांगलादेशातील रंगपूर येथे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच बिहार, प. बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम भागात जालणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक मोकळ्या रस्त्यांवर धावले. आतापर्यंत कोणतीही जीवित अथावा वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या