मिझोरामला भूकंपाचा धक्का; पंतप्रधानांनी घेतला आढावा

earthquake-measuring

ईशान्य हिंदुस्थानातील मिझोरामला सोमवारी पहाटे भूकंपाचा मध्य स्वरूपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 असल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. मिझोरामममध्ये पहाटे 4.10 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपचा केंद्रबिंदू चम्फाईपासून 27 किलोमीटर दूर दक्षिणेकडे होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपानंतर मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्याशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले.

ईशान्य हिंदुस्थानला रविवारीही भूंकपाचे धक्के जाणवले होते. तर गेल्या काही दिवसांपासून जम्मू कश्मीर, नवी दिल्ली आणि गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे या घटना मोठ्या भूकंपाचे संकेत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या