दिल्लीसह उत्तर हिंदुस्थान भूकंपाने हादरला

दिल्ली-एनसीआरसह उत्तर हिंदुस्थान भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी नोंदवली गेली. रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी हे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र भूकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर आले आहेत.

दिल्लीसह हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही राज्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये फैजाबाद येथे असल्याची प्राथमिक माहिती आहे.