सातार्‍यात कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य झटके, सुदैवाने जीवितहानी नाही

449
earthquake-measurement

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात सकाळी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती. हा भूकंप कोयना धरणापासून 13.60 किमी दूरवर झाला. तर भुकंपाचे केंद्रबिंदू कोयना धरणापासून 11.2 किमी वारणा खोर्‍यात होते. सुदैवाने यात कुठलेही जीवितहानी झाली नाही.

यापूर्वी पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. पालघरमध्येही 3.1 रिश्टर इतकी भूकंपाची तीव्रता होती. भूकंप सुरू झाल्यानंतर लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या