राहुल गांधींच्या रेप इन इंडिया वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

568

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये मोदी सरकारवर टीका करताना ‘रेप इन इंडिया’ असा शब्दप्रयोग केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने राज्याकडून अहवाल मागितला आहे.


केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने राज्याच्या अधिकार्‍यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचे तपशील मागवले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी सभा होती. तेव्हा मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडिया ही योजना आणली होती. आता देशात सगळीकडे रेप इन इंडिया दिसत आहेत.” या वक्तव्याचे पडसाद लोकसभेतही पडले होते. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी केली होती. परंतु माफी मागण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला.

राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे माहिती मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या