लोकसभा निवडणुकीसाठी 9 हजार 436 ईव्हीएम बॅलेट युनिट

31
printed-receipt-evm

सामना प्रतिनिधी । नागपूर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे नागपूर जिल्ह्याकरिता बेल (बेंगलूर) येथून एम-3 ईव्हीएम वर्झन असलेले 9 हजार 436 बॅलेट युनिट व 5 हजार 486 कंट्रोल युनिट प्राप्त झाले आहे. ईव्हीएम मतदान यंत्राची प्रथमस्तर तपासणी करतांना प्रक्रिया समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एबीसी विंग गोडावूनमध्ये मंगळवारपासून तपासणी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उपस्थित सुरु करण्यात आलेली आहे. ही तपासणी दररोज सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहणार आहे. ही तपासणी संपूर्ण बॅलेट व कंट्रोल युनिटची तपासणी पूर्ण होईपर्यंत सुरु राहणार आहे. बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची प्रक्रिया समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या