
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीच्या उत्तर आणि दक्षिण अवेन्यु भागात खासदारांसाठी 400 घरे बांधण्यात येत आहे. त्यापैकी 36 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. या घरांचे वैशिष्ट्यै म्हणजे ही सर्व घरे इकोफ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक आहेत. या घराच्या बांधकामासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.
या घरांच्या बांधकामासाठी तुटलेल्या विटा, कोळशाची राखेपासून बनवलेल्या विटा तसेच बांधकाम करताना निर्माण झालेला टाकाऊ माल वापरण्यात आल आहे.
हे घर जरी पर्यावरणपूरक असले तरी ते एका अलिशान घराइतकेच सुंदर आहे. या घरात सात खोल्या असतील ज्यात कार्यालयाचाही समावेश असेल. या घरांमध्ये लिफ्ट आणि अंडरग्राऊंड पार्किंगचीही सोय असेल.
खासदार सदनाची वैशैष्ट्यै
- घर 450 स्क्वेअर मीटर असून ड्युप्लेक्स पद्धतीचे आहे.
- घरात 7 खोल्या असून त्यात एक बैठकीसाठी, चार बेडरूम आणि दोन कार्यालयाचां समावेश आहे.
- पहिल्या मजल्यावर पूजाघरही असणार आहे.
- घर जरी एक मजली असली तरी लिफ्टची सोय देण्यात आली आहे जेणेकरून बेसमेंटहून पहिल्या मजल्यावर जाण्यास सोपे पडेल.
- घरात अंडर ग्राऊंड पार्किंगची सोय असून त्यात दोन गाड्या पार्क होतील इतकी जागा आहे.
- घरात बाहेरचा प्रकाश रहावा म्हणून मोठ मोठ्या खिडक्या बनवण्यात आल्या आहेत.

























































