IT नंतर ED ची कारवाई; बीबीसी इंडियाविरुद्ध गुन्हा दाखल, काहींचे जबाब नोंदवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सक्तवसुली संचालनालयाने (ED) BBC India विरुद्ध विदेशी चलन नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत फेमा गुन्हा नोंदवला आहे. अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचं गुरुवारी पीटीआयनं सांगितलं.

फेडरल प्रोब एजन्सीने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (FEMA) च्या तरतुदींनुसार कागदपत्रे आणि काही कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग देखील मागवले आहे, असंही सूत्रांनी सांगितल्याचं या वृत्तात म्हटले आहे.

कंपनीद्वारे कथित विदेशी थेट गुंतवणुकीचे (एफडीआय) उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे, असं ते म्हणाले.

आयकर विभागाने फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीतील बीबीसी कार्यालयाच्या परिसरात धाड टाकली होती. त्यानंतर आता हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

आयकर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं बीबीसी समूहाच्या विविध संस्थांनी दाखवलेले उत्पन्न आणि नफा हे त्यांच्या हिंदुस्थानातील कामकाजाच्या प्रमाणात ‘सुसंगत नाहीत’ आणि कर भरला गेला नाही असे म्हटलं होतं.