अनिलकुमार पवार यांच्यासह अन्य आरोपींची 71 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार तसेच विकासक सिताराम गुप्ता आणि अन्य लोकांची मिळून 71 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. पीएमएलए कायद्यान्वये ईडीने ही कारवाई केली.

वसई-विरार परिसरात मलनिस्सारण व डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या 60 एकर भूखंडावर पवार व अन्य आरोपींनी बेकायदेशीरपणे 41 अनधिकृत इमारती उभ्या केल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनिलकुमार पवार हे आयुक्तपदावरून निवृत्त होताच दुसऱ्याच दिवशी ईडीने त्यांना उचलले होते. त्यानंतर त्यांची अनेकदा चौकशी करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने आता पवार, गुप्ता व अन्य आरोपींशी संबंधित 71 कोटी स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. यापूर्वीही ईडीने या आरोपींशी संबंधित मालमत्ता जप्तीची कारवाई केली होती.