शाळा सुरू होण्याआधी पुस्तके मिळणार, समग्र शिक्षा अभियानाला प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके पोहोचवण्याचे नियोजन केले असून या वर्षीदेखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठय़पुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत पाठय़पुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला.

‘समग्र शिक्षा अभियान’अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य सरकारच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2022 पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठय़पुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठय़पुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्याकरिता मोफत पाठय़पुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. शालेय वर्ष 2022-2023 करिता एकूण 5 कोटी 40 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन
सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर प्रतिदिन एकूण 2464 दशलक्ष लिटर क्षमतेने मलजलावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर शक्य होणार आहे. त्यासोबतच पर्यावरणाचा ऱहासदेखील टाळला जाणार आहे.