विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दीड वर्षापूर्वी देऊनदेखील कोणतीही कार्यवाही न करणारे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत आज पालिका मुख्यालयातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.