मनाच्या फिटनेसचा सन्मान

331
Davos: Hilde Schwab (L), Chairperson and Co-Founder, Schwab Foundation for Social Entrepreneurship presents Annual Crystal Award to actress Deepika Padukone, Founder, Live Love Laugh Foundation, India at the World Economic Forum Annual Meeting 2020, in Davos-Klosters, Switzerland, Monday, Jan. 20, 2020. (World Economic Forum/PTI Photo) (PTI1_21_2020_000056B)

स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकोनॉमिक फॉरमच्या 26 व्या क्रिस्टल ऍवॉर्डने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला सन्मानित करण्यात आले आहे. मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी दीपिकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘एकेकाळी मी नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. रोज सकाळी उठल्यावर मी संपलेय हा एकच विचार मनात यायचा. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता नसल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली होती. यातून बाहेर आल्यावर असे काहीतरी करायचे ज्यामुळे कमीत कमी एकाचे तरी प्राण वाचेल असा निर्धार मी केला. त्याप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून डिप्रेशनविषयी जनजागृती करायला सुरुवात केली’, अशा भावना दीपिकाने पुरस्कार सोहळ्यादरम्यान व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या