
केसामध्ये अचानक कोंडा होतो. बहुतेक लोकांच्या टाळूवर हा बुरशीचा प्रकार असतो, जो टाळूच्या त्वचेतील तेलावर वाढतो आणि कोंडा तयार करतो. त्यामुळे केस गळती सुरू होते. कालांतराने टक्कल पडायला सुरुवात होते. कोंडा झाल्याने डोक्याला सारखी खाजसुद्धा येते. त्यावर उपाय म्हणून खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून टाळूला लावा. असे केल्यास केसातील कोंडा कमी होतो.
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि टाळूला लावा. केसातील कोंडा घालवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. दही आणि लिंबाच्या रसाचा फेस पॅक तयार करून टाळूला लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ केस धुवा. त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या.