ट्रेंड – मगरीने उडवली दाणादाण

एका मगरीने दाणादाण उडवल्याची घटना नुकतीच वडोदरा येथे घडली. वडोदराच्या रहिवाशांना नरहरी विश्वामित्री नदीच्या पुलाजवळील रस्त्यावर आठ फूट लांबीची मगर दिसली आणि एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी मगरीला पाहण्यासाठी गर्दी केली, तर काही जण मगर पाहून सैरावैरा धावत सुटले. या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली. अनेकांनी हा क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना विश्वामित्री नदीपासून फार दूर नसलेल्या परिसरात असलेल्या नरहरी हॉस्पिटलजवळ आयुक्तांच्या बंगल्याजवळ घडली. स्थानिक अधिकाऱयांच्या मदतीने मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळाले आणि नंतर पुन्हा नदीत सोडण्यात आले. वडोदरामधून वाहणारी
विश्वामित्री नदी तिच्या मगरींच्या संख्येसाठी ओळखली जाते.