बिहारमध्ये वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये मेंदुज्वराने आधीच शंभरहून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. आता वीज कोसळून 8 बालकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. तेव्हा या बालकांसह काही लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे होते. तेव्हा वीज कोसळली आणि 8 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही नागरिकही जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या