पाकिस्तानमध्ये रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, पाच जण जागीच ठार

63

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद 

पाकिस्तानमध्ये एका रुग्णालयात बुरखाधारी महिलेच्या आत्मघातकी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुन भागात एका चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांचे मृतदेह जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा तिथे एक बुरखाधारी महिला हजर होती. तिने आत्मघातकी हल्ला केला आणि त्यात अजून पाच जणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले आहेत.

हल्ल्याची जबाबदारी तहरीक –ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात 7-8 किलोंचे विस्फोटक वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच जखमींवर लष्कराच्या इस्पितळात उपचार सुरू आहे. या हल्ल्यात काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या