दक्षिण म्यानमारमध्ये प्रवासी फेरी बोट उलटल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी असून 18 जण बेपत्ता आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे, असे मायेक अग्निशमन सेवा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तनिन्थरी विभागातील मायेक जिल्ह्यातील पलाव टाउनशिपमध्ये रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 च्या सुमारास हा अपघात झाला. बोटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसल्याने ती ओव्हरलोड झाली आणि हा अपघात घडल्याचे अधिकाऱ्याने पुढे नमूद केले.
या भागातील खराब हवामान आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आम्हाला पुढील माहिती मिळवण्यात अडचण येत असल्याचे अधिकारी बोलले. शोध मोहिम अद्याप सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.