एकनाथ खडसेंच्या जावयाची तुरुंगातून सुटका

भोसरी येथील भूखंड खरेदीशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची मंगळवारी सायंकाळी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलैला गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर केला होता तसेच विशेष पीएमएलए न्यायालयाला जामिनाच्या अटी-शर्ती आखून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर चौधरी यांना तुरुंगातून सोडून देण्याचे निर्देश दिले होते. विविध अटींनुसार जामीनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गिरीश चौधरी तुरुंगातून बाहेर पडले.