विद्यमान उभे, पडेल खुर्चीत! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सत्तारांचा अपमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मराठवाड्यातील विकासाचा आढावा घेतला. या आढावा बैठखीत शिंदे-फडणवीस गटाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तातर यांचा घोर अपमान झाला. विद्यमान असूनही सत्तार यांना बैठकीत खुर्चीच मिळाली नाही, पडेल रामदास कदम यांच्या मागे त्यांना खडा पहारा द्यावा लागला.

रामदास कदम यांची घुसखोरी

खेड मतदारसंघातून पराभूत झालेले रामदास कदम सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही पद नाही. असे असतानाही आढावा बैठकीत घुसखोरी करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारची खुर्ची बळकावली. आढावा बैठकीत आमदार सत्तार आले. मुख्यमंत्र्यांच्या रांगेत खुर्चीच नसल्याचे पाहून सत्तार रामदास कदम यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. कदम आता उठतील, मग उठतील या आशेवर ते बराच वेळ उभे राहिले. परंतु कदम काही उठले नाहीत. शेवटी एक खुर्ची रिकामी झाल्यानंतर सत्तारांनी आपला मोर्चा त्या खुर्चीकडे वळवला.