
मिंधे गटाला आज अमरावतीमध्ये जोरदार झटका बसला. अमरावतीच्या सांस्पृतिक भवनात मिंधे गटाचा मेळावा सुरू होता. त्या मेळाव्यात शिंदे बोलत असतानाच राजापेठ येथील शिवसेना भवनात मिंधे गटातील शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मिंधे गटात सक्रिय असलेल्या वंदना घुगे व त्यांच्या सहकाऱयांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जयघोष करीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या सहसंपर्पप्रमुख प्रतिभा बोपशेट्टी, जिल्हाप्रमुख मनीषा टेंबरे, ज्योती अवघड, वर्धा संपर्पप्रमुख कांचन ठापूर उपस्थित होत्या.
मिंधे गटातून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शालिनी उगले, सुवर्णा काळे, शीतल भरे, मीना बगळे, स्वाती बाभूळकर, अश्विनी केचे, निर्मला वाट, मीना ठापूर, रजनी घरडे, छाया भारती, संगीता पुंड, अलका उभाड, पुष्पा गाळे, चंद्रकला नरोडे, कांता इंगळे, रुद्राबाई पुणकर, ममता गुल्हाने, माधवी सागर, सुचिता विखार, प्रिया राऊत, शारदा पुनसे, संगीता राऊत, नर्मदा भांडे, काwसल्या सरदार यांचा समावेश आहे.