
मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली आहे. बुधवारी रात्री ते गुपचूप दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मिंधे गटाची चांगलीच गोची झाली आहे. त्यातच महाराष्ट्र भाजपकडून मिंधे गटाकडे दुर्लक्ष सुरू असल्याने त्यांच्या गटातील मंत्री नाराज आहेत. त्यामुळे अधिवेशन सोडून मिंध्यांनी दिल्ली गाठल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.