डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला 36 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोपाळमध्ये एका 85 वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून भामट्यांनी 36 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आले. वृद्ध व्यक्ती मिलिट्री इंजिनीअरिंग सर्विसेसमधून निवृत्त झालेली असून ते भोपाळमध्ये राहतात. दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे सांगून या वृद्ध व्यक्तीला तब्बल आठ दिवस डिजिटल अरेस्ट केले. एका खात्यातून 20 लाख तर दुसऱ्या खात्यातून 16 लाख असे एकूण 36 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पैसे पाठवल्यानंर भामट्यांनी फोन उचलणे बंद केले. त्यानंतर वृद्ध व्यक्तीने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.