50 टक्के क्षमतेने सभांना मंजुरी, पदयात्राही काढता येणार ; निवडणूक आयोगाची नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले होते. मात्र, आता देशात कोरोना नियंत्रणात येत असून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काही निर्बंध शिथील केले आहेत.

आता 50 टक्के क्षमतेने खुल्या मैदानात सभा घेण्यास राजकीय पक्षांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारास मनाई असेल. या वेळेव्यतीरिक्त पक्षांना प्रचारास परवानगी देण्यात आली आहे. याआधी प्रचारासाठी रात्री 8 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत मनाई करण्यात आली होती. तसेच नवीन नियमावलीनुसार पक्षाला पदयात्रा काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या नवी नियमावलीमुळे आता प्रत्येक पक्षाला प्रचारासाठी जास्त वेळ मिळणार आहे.