
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणाऱ्या 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता उद्या, 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील उद्याच मतदान होईल.



























































