
मतदार याद्या पुनर्विलोकन (एसआयआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा करणे बीएलओ कर्मचाऱ्यास चांगलेच भोवले आहे. निवडणूक बीएलओ म्हणून काम करणारा कर्मचारी शिवराम गारे या कर्मचाऱ्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुणीही आपल्या कामात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोन येथील लिपिक म्हणून कार्यरत असलेले अनंता गारे यांचीसुद्धा भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात बीएलओपदी नेमणूक करण्यात आली होती. परंतु सध्या सुरू असलेल्या मतदार याद्या पुनर्विलोकनाचे काम करताना अनंता गारे यांनी दुर्लक्ष केले. मतदारांच्या अर्ज वितरण कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.






























































