#ElectionResults2019 उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

4873
uddhav-thackeray
 • जनता आदित्यला प्रेम देतेय, आशिर्वाद देतेय त्यासाठी मी जनतेसमोर नतमस्तक होतोय. असेच आशिर्वाद कायम आमच्यासोबत असू द्या
 • ईव्हीएमबाबात आता कुणाच्याही मनात शंका नसेल
 • अत्यंत पारदर्शकपणे चर्चा करून सत्ता स्थापनेचा दावा करू
 • असाच महाराष्ट्र मला अपेक्षित आहे
 • महाराष्ट्राच्या जनतेने डोळ्यात अंजन घातलं आहे
 • गरज भासली तर अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल
 • भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासोबत बसून तो फॉर्म्युला ठरवावा
 • जो फॉर्म्यला ठरलेला तो भाजपने समोर आणावा
 • मात्र आता त्यांच्या अडचणी वाढत असतील तर मी सर्व समजू शकत नाही. माझाही पक्ष मला वाढवायचा आहे
 • लोकसभेच्या वेळी 50-50 ठरला होता. जागाही 144-144 जागा ठरल्या होत्या. मात्र भाजपच्या अडचणी मी समजून घेतल्या होत्या
 • रोजचे जे प्रश्न आहेत ते डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागले, जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करावं लागेल
 • अत्यंत जबाबदारीने सत्ताधाऱ्यांना काम करावे लागेल
 • आमच्या सर्वाचे डोळे जनतेने उघडलेयत
 • लोकं माजायला लागतात तेव्हा त्याचे पाय जमीनीवर ठेवण्याचे काम जनता करते
 • जनतेने लोकशाही जिवंत ठेवली
 • सत्ता स्थापन करता येतील एवढ्या जागा महायुतीला दिल्या आहेत
 • कोणत्याही दडपणाला बळी न पडता जनतेने मतदान केले आहे
 • महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आभार
आपली प्रतिक्रिया द्या