इलेक्ट्रीक गाड्यांसाठी मुंबईत 200 चार्जिंग स्टेशन्स

258

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढत आहे. मात्र त्याच्या चार्जिंगसाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन्स नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात मुंबईत दोनशे चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय टाटा पॉवरने घेतला आहे. सध्या मुंबईत टाटाची 30 चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. तसेच सदर इंधन परदेशातून आयात करावे लागत असल्याने त्यावर मोठा खर्च होतो. त्यामुळे केंद्र सरकारने विजेवर चालणाऱया वाहनांच्या वापराला चालना दिली आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासाठी टाटा पॉवरने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये 100 चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. तर मार्चअखेरपर्यंत देशभरातील चार्जिंग स्टेशन्सची संख्या 300 पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे टाटा पॉवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एकटय़ा मुंबईत पुढील वर्षापर्यंत चार्जिंग स्टेशन्सची संख्या दोनशेने वाढवली जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या